हो जी! या तुटपुंज्या अनुदानात घरकुल कसे पूर्ण करणार जी?

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांना नगर परिषद हद्दीतील लाभार्थ्यांना दोन लक्ष 50 हजार रुपये तर ग्रामीण भागात एक लक्ष 40 हजार रुपये अनुदान दिले जाते .नागरी हद्दीतील तुलनेत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान अतिशय तुटपुंजे असून वाढत्या महागाईत घर बांधणीचे साहित्य महागल्यामुळे या किमतीत घर उभारू शकत नसल्याने ग्रामिन भागातील नागरिकात नाराजगीचा सूर वाहत असून त्यांना घरकुल पूर्णत्वासाठी अतिरिक्त कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करावे लागत आहे त्यातच कित्येक लाभार्थ्यांचे घरकुल अर्धवट स्थितीत आहे तेव्हा ‘हो जी या तुटपुंज्या अनुदानात घरकुल पूर्ण कसे करणार जी’अशी व्यथा बोलून दाखवत आहेत.

ग्रामीण भागामध्ये सिमेंट, लोखंड,रेती ,विटा आदी बांधकाम साहित्य बहुधा शहरातून वाहतूक करून आणावे लागते त्यामुळे वाहतूक खर्च अतिरिक्त लागत असतो तर ग्रामीण भागात खर्च जास्त आणि शहरी भागात हा खर्च कमी लागतो तरीही शासनाकडून शहरी भागासाठी जास्त अनुदान आणि ग्रामीण भागासाठी कमी अनुदान दिले जाते .सध्या महागाई गगनाला भिडली आहे.सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत त्यामुळे ग्रामीन भागातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारे पंतप्रधान आवास योजनेचे 1 लक्ष 40 हजार रुपये अनुदान हे तोकडे पडत आहेत.उलट घरातून पैसे घालावे लागतात त्यासाठी अतिरिक्त कर्ज उचलावे लागते .मिळत असलेल्या अनुदानात घर पूर्णत्वास आणणे शक्य नाही .आधीच कमी असलेले अनुदान हे वेळेवर मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम अर्धवट ठेवण्याची वेळ लाभार्थ्यावर येत आहे.पैसे संपल्याने उसनवार करून घराचे स्वप्न पूर्ण करावे लागते त्यामुळे शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुदधा अडीच लक्ष रुपये अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी रेटून धरली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंकित तिवारीच्या लाईव्ह कॉन्सर्टने रविवारी खासदार क्रीडा महोत्सवाचे समापन

Fri Jan 20 , 2023
ग्रेट खलीची विशेष उपस्थिती : यशवंत स्टेडियमवर सोहळ्याचे आयोजन नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारी यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने समापन होणार आहे. रविवारी २२ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com