संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 4 :- तालुक्यातील रामकृष्ण लेआउट येथील सार्वजनिक तारा माता मंदिरातील अश्विन नवरात्राच्या पर्वावर स्थापन केलेल्या 51 घटाच्या मिरवणुकीने येरखेडा गाव दुमदुमले . अश्विन नवरात्रच्या पर्वावर तारा माता मंदिरात भाविकांनी 51 गट स्थापन केले होते मंदिराचे संस्थापक अध्यक्ष टिकाराम भोगे गुरुजी यांचे हस्ते पूजा आरती करून घट विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली ढोल, ताशे फटाक्याच्या आतिषबाजीत निघालेली मिरवणूक तारा माता चौक, झेंडा चौक, दुर्गा चौक ,तेलीपुरा हनुमान मंदिर, नगर भ्रमण करीत श्री शेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे पूजा आरती करून घट विसर्जन करण्यात आले घट विसर्जन मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले. मिरवणुकीत सरपंच मंगला कारेमोरे ,माजी सरपंच मनीष कारेमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता रंगारी , देवेंद्र गवते, वसंतराव गुजेवार, जगदीश झाडे, मधुकरराव ढोले, मुरलीधर पारधी ,वसंतराव फायदे ,घनश्याम कारेमोरे ,भाऊराव देशमुख, गजानन तिरपुडे, वनिता नाटकर, जया भस्मे, वंदना भस्मे, शीला देशमुख, रमेश कारेमोरे ,अशोक कार्यमोरे, राजू क्षीरसागर दास बाबू ,मीना दास, सुषमा राकडे ,प्रा किशोर ढोले, प्रा मनीष मुळे ,सुशील सोनटक्के ,प्रवीण भाईदे ,भोजराज अंबाळकर, गौरीशंकर ढिंबोले, सरिता भोयर, वत्सला गुजेवार, राम देशमुख, घनश्याम नावदिघे ,प्रवीण लुटे, अंकिता आगाशे, दादू भस्मे, प्रणय राखडे , मोना रेडू श मोठया संख्येनी भाविक भक्त उपस्थित होते.