संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
–खसाळा राख तलाव फुटल्याने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे दिले आदेश व राख तलाव फुटिस जबाबदार अधिका-यावर तात्काळ कारवाई करण्याचे दिले निर्देश.
कामठी ता प्र 20:-कामठी तालुक्यातील खसाळा येथिल कोराडी औष्णीक विद्युत केंद्राचा राख तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात खसाळा, म्हसाळा, कवठा, कोराडी, खैरी या गावांमध्ये राखेचे पाणी गेल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले याबाबत माहिती मिळताच कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांनी तात्काळ संबधित विभागांच्या अधिका-यांसह पाहणी दौरा केला यावेळी तहसिलदार अक्षय पोयाम, कोराडी औष्णीक विद्युत केंद्रचे मुख्य अभोयंता हरणे, कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंषुजा गराटे, कृषी विभाग, प्रदुषण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलत असतांना आमदार सावरकर यांनी नुकसान ग्रस्त भागातील शेतक-यांचे नुकसानिचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले व शिंदे फडणविस सरकार मध्ये कोणत्याही शेतक-यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. तसेच पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती महावितरण ने करून द्यावी असे आदेश दिले. यावेळी आमदार सावरकर यांनी तिव्र नाराजी व्यक्त रित तलाव फुटण्यास जबाबदार असणा-या अधिका-यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी जि.प. सदस्य मोहन माकडे, सभापती पं.स. कामठी . उमेश रडके, पंचायत समिती सदस्य. सविता रामचंद्र जिचकार, किशोर बेले, रवि पारधी, . किशोर बरडे, बंडू कापसे, . रामचंद्र जिचकार, रवि कुहिटे, मनिष मेश्राम, कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.