यवतमाळ :- दिनांक 26 डिसेंबर 2024 ला संघटनेचे सदस्य मोरेश्वर घुमडे रा. मदे ले-आऊट पिंपळगाव यांचा मुलगा हर्षल घुमडे यांनी नेवी नौदल प्रशिक्षण पूर्ण करून आज मर्चंट नेव्हीच्या डेक्क कॅडेट पोस्ट करिता त्यांचे निवड होऊन रुजू होण्यासाठी मुंबईला जाण्यापूर्वी वृत्तपत्र विक्रेता क्षेत्रातील मुलांच्या यशस्वी भरारी बद्दल त्यांचे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिव किरण कोरडे श्रीराम खत्री सचिन कदम राज्य संघटनेचे सदस्य किशोर बेदरकर त्याची आई वैशाली घुमडे वडील मोरेश्वर घुमडे आजी आजोबा भाऊ उपस्थित होते. त्याचे प्राथमिक शिक्षण संस्कार विद्यालयात, बारावी पर्यंतचे शिक्षण जवाहरलाल दंडा ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. नेव्हीचे शिक्षण समुद्रिय विश्वविद्यालय चेन्नई येथे यशस्वीरित्या पास करून आज त्याची पोस्टिंग झाली त्यानिमित्त त्याला पुढील आयुष्य करता शुभेच्छा देण्यात आल्या.