संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- २१ आगस्ट हा दिवस संपुर्ण जगात जागतिक वरीष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने युवा चेतना मंच तर्फे जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त रनाळा परिसरातील वरिष्ठ नागरिकांचा सत्कार माजी होमगार्ड तालुका समादेशक शिवचरण सहारे , वरीष्ठ शिक्षक भाऊराव चौधरी , वरीष्ठ शिक्षक श्रीराम काळे , दिव्यांग फाऊंडेशनचे अध्यक्ष ग्रापचंयात सदस्य प्रदीप (बाल्या )सपाटे , दिंव्याग फाऊंडेशनचे सचिव बाँबी महेंद्र , दिंव्याग फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अजय ठाकूर, जेष्ठ नागरिक संघटनचे अध्यक्ष नामदेव बाभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी गणेश सपाटे, विष्णू कुकडे,तुकाराम ठवकर, वंसत बोलबुंडेवार, रघुनाथ सायरे, हेमराज पगाडे, युवराज पगाडे , राधेश्याम नवले, भगवान कठाने, विजय क्षिरसागर, दशरथ देशमुख,अशोक सहारे, शंकर बावनगडे, महेंद्र डांगे , गंगाधर किंदर्ले , गजानन कुकडे, नरेन्द्र कुथे, निर्गुण पटले, महेंद्र कुर्वे, सुनिल भुजाडे, शिवकुमार शाहू अरसपुरे, सुभाष ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा.पराग सपाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अमोल नागपुरे, अक्षय खोपे,नरेश सोरते, लक्ष्मीकांत अमृतकर नितीन ठाकरे ,रुपेश चकोले आदींनी सहकार्य केले .