जागतिक लोकसंख्या दिन पंधरवाडा

गडचिरोली :- भारतातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यावर आळा घालण्याकरीता शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा आरोग्य विभागामार्फत गडचिरोली जिल्यात दिनांक 11 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिन पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

 जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय जागतिक लोकसंख्या दिन पंधरवाडा कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उदघाटन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.गडचिरोली डॉ.प्रताप शिंदे यांच्या हस्ते दिनांक 15 जुलै 2024 रोजी करण्यात आला. उद्घाटनीय भाषणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी आशा व आरोग्य सेविका मार्फत लोकसंख्या वाढीबाबतचे दुष्परीणाम समजावून सांगून जास्तीत जास्त लोंकांना कुटूंब नियोजन साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्याविषयी जनजागृती करावे यावर विशेष भर द्यायचा आहे असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.प्रफुल हूलके जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांनी केले असून त्यामध्ये जिल्यात दोन अपत्यामध्ये तीन वर्षाचे अंतर ठेवावे तसेच प्रसुतीच्या खेपेत सुध्दा सुरक्षीत अंतर ठेवणे व लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया तात्पुरत्या कुटूंबनियोजन पदधतीच्या साधनांचा अवलंब करावा जेने करुन माता व बालक सुदृढ राहतील याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ.प्रशांत आखाडे वैदयकिय अधिक्षक महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली यांनी “ओळख नव्या विकसीत भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पंत्याची” या घोष वाक्यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दोन बाळांमध्ये अंतर ठेवण्याकरिता आपल्याकडे उपलब्ध असणा-या तात्पुरत्या कुटुंब नियोजन पध्दतीबाबत सविस्तर माहीती दिल्या गेली.

या कार्यक्रमास उपस्थित डॉ. अमित साळवे, डॉ. बागराज धुर्व, डॉ. मसराम डॉ. पंकज हेमके, डॉ.गोरे, व डॉ. नन्नावरे पोतराजवार मेट़्रन उपस्थीत होते. तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, आरोग्य विभाग जिल्हा परीषद गडचिरोली येथील कर्मचारी तसेच शहरी विभागातील आशा कार्यकर्त्या व लाभार्थी उपस्थीत होते कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रामटेके पि. एच. एन. व आभार प्रदर्शन प्रविण गेडाम आरोग्य पर्यवेक्षक यांनी केले.

ब्रिदवाक्य

“माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी

दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा”

घोषवाक्य

“ओळख नव्या विकसीत भारताची

कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पंत्याची”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवाओ की चुनाव मे होंगी 50 टक्के भागीदारी - सलील देशमुख

Wed Jul 17 , 2024
– रा.यु.का. शरदचंद्र पवार से जुड़ रहे युवा  नागपूर :-आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी नागपूर शहर व नागपूर ग्रामिण पक्ष प्रवेश व नियुक्त पत्र वाटप का कार्यक्रम रवी भवन मे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के युवा नेता सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य,व महाराष्ट्र राज्य युवक के कार्य अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, व जिल्हा ग्रामिण अध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील की प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!