नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक पर्यावरण दिन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज 5 जून रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी व डॉ सबा खान यांच्या मुख्य उपस्थितीत झाडे लावा, झाडे जगवा हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला.   5 जून जागतिक पर्यावरण दिवस हा पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.असे मत डॉ शबनम खाणुनी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विविध उपक्रम आयोजित करून , झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे कार्य केल्या गेले . या सगळ्यातून पर्यावरणाचे महत्व बिंबवले गेले.

याप्रसंगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्त कार्यालयीन कर्मचारी सह आशा वर्कर गण उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१२ वी व १०वीची पुरवणी परीक्षा १६ जुलै पासून

Wed Jun 5 , 2024
नागपूर :-  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै २०२४ दरम्यान तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगष्ट २०२४ कालावधी दरम्यान घेण्यात येणार आहेत. तसेच १२ व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगष्ट २०२४ दरम्यान पार पडणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com