संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर- जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली बस स्टॉप जवळ काळी लाल टाटा एस सुपर चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यु झाल्याने कन्हान पो. स्टे ला आरोपी वाहन चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१८) मार्च ला दुपारी ३.१५ वाजता दरम्यान गौरव ज्ञानेश्वर तांदुळकर वय २२ वर्ष रा. कुंभापुर ता. मौदा हे पत्नी प्रांजु गौरव तांदुळकर वय २१ वर्ष व मोठा भाऊ रोशन तांदुळकर यांचा सोबत वाघोली गावातुन निघुन कन्हान मार्गे कुंभापुरला जाण्याकरिता पायदळ वाघोली बस स्टॉप जवळ येऊन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग रोड पार करित असतांना नागपुर कडुन येणाऱ्या काळी लाल टाटा एस सुपर एमएच.३१ डी एस ४१२१ च्या चारचाकी वाहन चालक कलीम शमी खान वय ५० वर्ष रा. नागपुर याने आपल्या ताब्यातील वाहन अती भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन गौरव यांचा पत्नी ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघाता त महिलेचा डोक्याच्या उजव्या बाजुला जबर मार लागु न रक्त स्त्राव झाल्याने मेयो रुग्णालय नागपुर येथे नेता ना रस्त्यात तिचा मृत्यु झाला. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी गौरव तांदुळकर यांचे तक्रारीवरून आरोपी वाहन चालक कलीम खान यास अटक करुन त्याचे विरुद्ध अप क्र. २२८/२४ कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), सहकलम १८४ मपोका अन्वये गुन्हा दाख ल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतिश फुटाणे हे करित आहे.