संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील टीचर कॉलनी पाणी टाकी जवळ येरखेडा येथे महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारला सकाळी सहा वाजता सुमारास उघडकीस आली असून इंदुबाई रमेश झाडे वय 60 असे मृत महिलेचे नाव आहेत नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदुबाई रमेश झाडे वय 60 राहणार टीचर कॉलनी पाणी टाकीज जवळ येरखेडा ह्या पती, मुलगा ,सून व नातवडा सह वास्तव्यास होते मंगळवारला रात्री साडेदहा अकरा वाजता सुमारास सर्वांनी सोबत जेवण करून आपल्या बेडरूम मध्ये झोपण्याकरिता गेले पहाटे चार वाजता सुमारास पती रमेश रामाजी झाडे लघुसंख्य ला गेले असता पत्नी बेडरूम वर बसून दिसली , पत्नीला विचारले का बरं तिने असेच बोलून काहीही सांगितले नाही असंच साहजिक बसले असल्याचे सांगितले त्यानंतर दोघेही झोपी गेले सकाळी साडेपाच वाजता सुमारास इंदुबाई रमेश झाडे यांनी गॅलरीमध्ये स्टूलवर उभी राहून छताच्या हुकाला साडी ने गळफास लावून आत्महत्या केली पती रमेश झाडे सकाळी उठले असता पत्नी इंदुबाई बेडरूम मध्ये दिसलीनाही त्यामुळे त्यांनी शोधा शोध केली असता गॅलरीत पत्नी लटकलेल्या स्थिती दिसून आली त्यांनी लगेच मुलगा व सून ला बोलवून माहिती दिली घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतीगे सहकार्यासोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे आत्महत्येचे कारण कळले नाहीत पण परिसरात आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.