खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो…

स्थगिती सरकार हाय हाय…

ओला दुष्काळ जाहीर करा…

अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला…

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ईडी सरकारविरोधात विरोधी पक्ष आक्रमक…

मुंबई दि.१७ ऑगस्ट – ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले.. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला…

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रगीताचे समूह गायन..

Wed Aug 17 , 2022
नागपूर, दि.17 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू आहे. आज या महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी बरोबर अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी बचत भवनमध्ये उपस्थित होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सर्वप्रथम आजच्या दिनाचे औचित्य व राष्ट्रगीत निर्मिती आणि समूह गानाचे महत्व याबाबतचे निवेदन केले. त्यानंतर बरोबर 11 वाजता समूह राष्ट्रगीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com