‘संगीत महामहोपाध्याय’ उपाधीने डॉ. मंगरूळकर यांचा गौरव

नागपूर :- नागपुरातील ज्येष्ठ संगीत साधक आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ख्यातकीर्त असलेले डॉ. नारायणराव मंगरूळकर यांना ‘संगीत महामहोपाध्याय’ या सर्वोच्च उपाधीने गौरविण्यात आले आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात, संगीत क्षेत्रातील अलौकिक योगदानाबद्दल डॉ. मंगरुळकर यांना ‘संगीत महामहोपाध्याय’ ही उपाधी बहाल करण्यात आली. डॉ. मंगरूळकर यांच्या या सन्मानामुळे संगीत क्षेत्रात आनंद पसरला असून, सर्व थरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

डॉ. मंगरूळकर यांचे प्रारंभिक संगीत शिक्षण सावळाराम मास्तर, पंडित शंकरराव सप्रे आणि त्यानंतर पं. राजाभाऊ कोकजे यांच्याकडे झाले. डॉ. सुमती मुटाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘वैदर्भीय संगीताच्या परंपरा’ या विषयावर सखोल संशोधन केले. त्यांचे हे संशोधन संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ठरले आहे. वयाच्या चौऱयाऐंशीव्या वर्षी देखील अखंड संगीत साधना व विद्यार्थी-साधकांना मार्गदर्शन असा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत एकवीस विद्यार्थ्यांनी संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली आहे.

त्यांनी अनेक लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. संगीतशास्त्र विजयिनी, वैदर्भीय संगीतोपासक तसेच संगीतातील घराणी आणि चरित्रे इत्यादी ग्रंथांना विद्यापीठीय अभ्यासक्रमात आधार ग्रंथ म्हणून मान्यता आहे. नरुवा या टोपण नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी अत्यंत रसाळ आणि राग स्वरूप स्पष्ट करणाऱ्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"ताबेदारी छोड़ो आओ सियासत में साझेदारी करे"

Fri Aug 25 , 2023
नागपूर :- इंडियन यूनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र प्रदेश कमिटी व इंडियन यूनियन मुस्लिम लीग नागपुर शहर द्वारा महाराष्ट्र के नागपुर शहर में मुस्लिम लीग के राष्ट्रीय सदस्यता अभियान कार्यक्रम की शुरुवात की गई। इस अवसर पर बड़ी संख्या में लोगो ने मुस्लिम लीग पार्टी की ऑनलाइन एप के माध्यम से सदस्यता लेकर मुस्लिम लीग पार्टी में शामिल हुवे। मुस्लिम लीग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com