हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित 15 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 13 विधेयके संमत झाली. संयुक्त समितीकडे एक विधेयक, प्रलंबित एक विधेयक. विधानपरिषदेने संमत केलेली 4 विधेयक विधानसभेत संमत करण्यात आली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 1 असून 1 सूचना मान्य करण्यात आल्या. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन

Sun Dec 22 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील विभागीय कार्यालयाचे शनिवारी गुरुवार 21 डिसेंबर 2024 रोजी आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मानाचे दादोजी कोंडदेव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, छत्रपती पुरस्कार असे चारही पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी क्रीडा सहसंचालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!