हिवाळी 2023 पर्यावरण अभ्यास विषयाची परीक्षा 18 नोव्हेंबर रोजी होणार

– संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, पर्यावरण अभ्यास विषयाची लेखी परीक्षा ज्या परीक्षाथ्र्यांना देणे आवश्यक आहे अशा परीक्षेस पात्र असलेल्या व परीक्षा आवेदनपत्र भरलेल्या हिवाळी-2023 मध्ये प्रवेशित होणा-या माजी विद्याथ्र्यांची लेखी परीक्षा विद्यापीठाव्दारे निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर शनिवार, दिनांक 18 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 ते 12.00 या वेळेमध्ये होणार आहे.

परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यास या आवश्यक विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या वेळात्रकाची माहिती देण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील यांनी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागप्रमुख यांना पत्र पाठवून कळविले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता संचालक मोनाली तोटे पाटील (9763833969) यांचेशी संपर्क साधता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

10 ऑक्टो.ला कांशीराम स्मृतिदिन

Wed Oct 4 , 2023
नागपूर :- बामसेफ, बीआरसी, डीएस-फोर व बीएसपी चे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांचा 17 वा स्मृतिदिन 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता देशपांडे सभागृहात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रभारी डॉ अशोक सिद्धार्थ, दुसरे प्रदेश प्रभारी नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने, स्थानिक प्रदेश प्रभारी व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज एड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com