नागपूरसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध..

नागपूर दि. 28 : नागपूर विभागातील चार लोकसभा मतदासंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 75 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. शनिवार दिनांक 30 मार्च ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

विभागातील पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून 54 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून 22 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले. त्यापैकी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे 3 अर्ज,नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्ष्यांच्या उमेदवारांचे 4 अर्ज तर 15 अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. या लोकसभा मतदारसंघात 40 नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते.

गडचिरोली-चिमूर मतदार संघातील नामनिर्देशनपत्रांच्या छाननीत या मतदारसंघात दाखल पैकी संपूर्ण 12 अर्ज वैध ठरले. यात अे.बी. फॉर्म नसलेल्या दोन राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरवले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशनपत्र छाननी नंतर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघात एकूण 36 उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले होते. रामटेक लोकसभा मतदारसंघाची माहिती अप्राप्त आहे.

विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी रविवारी 30 मार्च रोजी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चाय - पानी खर्च पर निर्भर है भाजपा या कांग्रेस की जीत !

Thu Mar 28 , 2024
– सबसे बड़ा लाभार्थी मीडिया व उसके मुखिया,मीडिया संगठन के नेतृत्वकर्ता बावजूद इसके जिला मुख्य चुनाव अधिकारी की चुप्पी,क्या CEC की कथनी और करनी में फर्क है ! नागपुर :- ग्राम पंचायत चुनाव हो या लोकसभा चुनाव,सभी चुनाव में अधिकतम खर्च की सीमा CEC द्वारा निर्धारित की जाती हैं.इसके बावजूद अनगिनत खर्च करने के बावजूद कड़ी टक्कर देने वालों में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com