अमरदिप बडगे
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चांदोरी बुजुर्ग येथील आई व वडील मरण पावल्याने दोन मुले अनाथ झाली असुन त्यांचा पालन पोषण करणारा कुणीच नसल्याने ही मुले पोरकी झाले आहेत.
आई प्रमीला खेवले किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुळे मृत्यू झाला होता. तर अवघ्या दीड वर्षानंतर म्हणजे याच महिन्यात ९ जुनला वडील देवीदास खेवले यांचा देखील आजाराने निधन झाले. त्यात देवीदासला दोन मुले आहेत एक मुलगा ओमकार देवीदास खेवले वय १६ वर्ष वर्ग ११ वी मध्ये शिकत आहे तर दुसरा मुलगा पियुष देविदास खेवले वय १२ वर्षे असुन ९व्या वर्गात शिकत आहे.अशा या दोन्ही मुलांचे आई-वडीलांचे डोक्यावरचे क्षत्र हरपल्याने ही पोरं आई-वडिलांवीना पोरकी झाली आहेत.
अशा वेळी घटनेची माहिती मिळताच चांदोरी बुजुर्ग या गावाला प्रहार जनसक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांनी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली.अशा या दोन्ही मुलांचा आता वाली कोणी उरला अशा वेळी या मुलांना कोणी मदतीचा हात पुढे करेल काय? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
प्रदिप निशाने तालुका अध्यक्ष यांनी सांगितले की या मुलांकरिता शासनाच्या काही योजना असेल तर नक्कीच या दोन्ही मुलांना योजना मिळुन देण्याचा प्रयत्न करेन . तरिदेखील या दोन्ही मुलांना मदतीचा हात देऊन सहकार्य करण्याची गरज आहे.यामुळे काही संस्था देखील आहेत.पण या मुलांच्या मदतीला हात द्यायला कोणी येणार काय ?