पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून केला खून..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 31:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या आवंढी गावात वर्षाच्या शेवटच्या रात्री पती पत्नीत दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याचा वाद विकोपाला गेल्याने पत्नीने पती झोपेत असल्याचे संधी साधून संतापून पतीच्या डोक्यात दगड घालून जीवानिशी ठार केल्याची घटना गतरात्री घडली असून मृतक पतीचे नाव आनंद भदुजी पाटील वय 50 वर्षे रा आवंढी असे आहे तर आरोपी पत्नीचे नाव अरुणा पाटील असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक आनंद पाटील हा मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरीचे काम करीत असून घरबांधणीचे काम करीत होता. मात्र त्याला दारूचे व्यसन जडल्याने पती पत्नीत वाद होणे हे नित्याचेच झाले होते.त्यानुसार काल रात्री मृतक पतीने आरोपी पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता दोघात झालेला वाद हा विकोपाला गेल्याने पत्नीने दारू वरून नेहमी होत असलेल्या भांडणाला कंटाळून पती झोपी गेले असता संधी साधून त्याच्या डोक्यात दगड घालून जीवानिशी ठार केले .व खुद्द नविन कामठी पोलीस स्टेशन ला येऊन सदर घटनेची आपबीती सांगून पतीचा खून केल्याची माहिती दिली.यासंदर्भात नवीन कामठी पोलिसांनी आरोपी पत्नी अरुणा पाटील वय 45 वर्षे रा आवंढी तालुका कामठी विरुद्ध भादवी कलम 302 अनव्ये गुन्हा दाखल केला .

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकोय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असून मृतकाच्या कुटुंबात आरोपी पत्नी सह मयूर नावाचा एकुलता एक मूलगा आहे.दारूच्या व्यसनाने एक चांगले कुटुंब उध्वस्त झाले हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रणाळा-भिलगाव मार्गावरील नाल्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला..

Sun Dec 31 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 31:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा-भिलगाव मार्गावरील बन्सल कपनीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकोय उपजिल्हा रुग्णालयात हलविन्यात आले आहे.सदर मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com