कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करताना मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

– राज्यपालांच्या हस्ते मुंबई व नोएडा टांकसाळीतील नाण्यांवरील पुस्तके प्रकाशित

मुंबई :-  वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या – त्या काळातील घटनांवर व इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशाइतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते नाणे शास्त्रज्ञ व संग्राहक डॉ. दिलीप राजगोर यांनी लिहिलेल्या ‘कॉइन्स ऑफ मुंबई मिंट: १९४७ ते २०२३’ व ‘कॉइन्स ऑफ नोएडा मिंट : १९८८ ते २०२३’ या दोन पुस्तकांचे सोमवारी (दि. १०) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

भारतात ५५० पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टाकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाल, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शासकांची देखील आपापली नाणी होती, असे राज्यपालांनी सांगितले. आपल्या वैयक्तिक संग्रहामध्ये व्हिक्टोरिया राणी, राजे पंचम जॉर्ज व षष्ठम जॉर्ज यांचे चित्र असलेली नाणी असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वापरतो, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

डॉ. राजगोर हे नाणेशास्त्र या विषयावर लिखाण, ब्लॉग व यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या मुंबई व नॉईडा टांकसाळीत नाण्यांच्या पुस्तकामधून अनेक दुर्मिळ नाण्यांची माहिती मिळते, असे नाणे संग्राहक डॉ. प्रकाश कोठारी यांनी यावेळी सांगितले.

प्रकाशन सोहळ्याला लेखक डॉ. राजगोर, अशोकसिंग ठाकूर आणि डॉ. राजगोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आ.सावरकर यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

Tue Jul 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-शहरातील मेन रोड येथील श्री कोचिंग क्लासेस येथे दहावी-बारावी परीक्षेतील प्राविण्यप्राप्त गुणवंतांचा सत्कार आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला. मानसी जैस्वाल,रोशनी चावला,धनश्री शेंडे,माही पटले, कृतिका पाटील,समृद्धि भोवते,अजय कुशवाहा, समीर राऊत, उज्वल समुन्द्रे, निहाल मानकर यांच्या सह इतर 25 विद्यार्थाचा स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष संजय कनोजिया,भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,सुनिल खानवानी,रनाला सरपंच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!