संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-एक आठवड्यात बांधकाम पूर्णत्वास न आल्यास आमरण उपोषणाला बसणार – माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर
कामठी :- केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर उडानपूल बांधकामासाठी 65 कोटी 29 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून उडानपूल बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण करून देण्याच्या निर्देशित पाच वर्षांची मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांच्या मनमणीपणामुळे काम पूर्णत्वास आले नसून उलट कामात संथपणा सुरू आहे.मात्र बांधकामात सुरू असलेल्या संथपणामुळे कामात गती दिसून येत नाही परिणामी रमानगर रेल्वे फाटक मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह, वाहतूकदार, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग, शेतकरी वर्ग, नोकरीपेशे तसेच व्यवसायिक वर्गातील नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. याची जाणीव असूनही येथील कंत्राटदाराला सत्ताधारी भाजप नेत्यांचा आश्रय असल्याने कंत्राटदारात अभयपणा निर्माण झाला असून मनमानी कारभार सुरू आहे तेव्हा या उडानपूल बांधकामाच्या कंत्राटदाराने रागाचा अंत न पाहता बांधकामाला गती द्यावी तसेच एक आठवड्यात बांधकाम पूर्णत्वास न आल्यास शासनासह कंत्राटदारा विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकातुन व्यक्त केले.
कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या रमानगर उडानपूल बांधकाम पाच वर्षांच्या मुदतीत सण 2020 पर्यंत करून देणे हे नियोजित होते मात्र दरम्यान आलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे काम थंडबसत्यात असल्याने पुनश्च या कामाला 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ संपूनही बांधकाम पूर्णत्वास येईना अशी अवस्था आहे. बांधकामाच्या नावाखाली रमानगर रेल्वे फाटक मार्ग बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे तसेच आजनी भुयार पुलिया बांधकाम प्रगतीपथावर असल्याने या दोन्ही मार्गाने जड वाहने तसेच शालेय ,महाविद्यलयीन बस वाहतुकीला आळा बसला आहे.ज्यामुळे वाहतुकदारासह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे.तेव्हा संबंधित कंत्राटदाराला असलेल्या राजकीय शह मुळे कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू आहे.या मनमानी कारभाराला थांबा देत येत्या एक आठवडयात बांधकाम पूर्णत्वास न आल्यास शासन व कंत्रातदारा विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचे कांग्रेस नेता माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले.