संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अंगणवाडीच्या कारभारात पूर्णता पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या वतीने कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या हातात स्नार्टफोन देत दहा राजिस्टर ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती पण निकृष्ट् दर्जाचे मोबाईल असल्याने दहा रजिस्टर ऑनलाईन भरणे शक्य होत नव्हते त्यानंतर हे मोबाईल दूर सारत परत अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल दिले तरीसुद्धा अंगणवाडी सेविकांना रजिस्टर लिहिणे व मोबाईलवर सर्व माहिती भरणे असे दुप्पट काम करावे लागते त्यामुळे कामठी तालुक्यातील अंगणवाडी केव्हा पेपरलेस होणार अशी विचारणा करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविकांच्या कामात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाने कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर हे तंत्रज्ञान वीकसीत केले आणि अंगणवाडी सेवीकाना मोबाईल दिले गेले या मोबाईल मध्ये विशेष सॉफ्टवेअर असून दहा प्रकारचे रजिस्टर ऑनलाईन भरता येणार आहेत या तंत्रज्ञानामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ वाचणार होता.रजिस्टर लिहिण्याचे काम संपणार होते. मात्र अंगणवाडी सेविकांना राजिस्टर लिहिणे व मोबाईलवर सर्व माहिती भरणे असे दुप्पट काम करावे लागत असल्याने पेपरलेस कामकाजाचा बट्ट्याबोळ होत आहे.