भंडाऱ्यात अजित पवार यांच्या भाषणावेळी अचानक तरुणांचा गोंधळ

भंडारा :- भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. विशेष म्हणजे डेंग्यू आजारातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी आज जाहीर कार्यक्रमात भाषण केलं. अजित पवार या कार्यक्रमात काय बोलणार? याकडे अनेकांचं लक्ष होतं. त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजनाबाबत माहिती दिली. पण त्यांचं भाषण सुरु असताना एक अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. अजित पवार यांचं भाषण सुरु असताना अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. या तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या तरुणांना तातडीने ताब्यात घेतलं. पण तरीही काही काळासाठी गर्दीमधील वातावरण तणावाचं बघायला मिळालं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“अनेक महत्त्वाचे निर्णय या सव्वा वर्षाच्या काळात घेतले आहेत, त्यातून माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना सुरु केली. शेतकऱ्यासाठी कोट्यवधी रुपये आपण खर्च करतो. शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा काढता येतो. याचा लाभ राज्यातल्या अक्षरश: लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. तो झालादेखील आहे. या योजनेतून शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी आणि आत्मनिर्भर राहण्यासाठी झालाय”, असं अजित पवार म्हणाले.

“प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आतापर्यंत 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दर आठवड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेत असतात. या बैठकीत आम्ही सर्वजण असतो. वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री या बैठकीत असतात. त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतात ते सांगण्याचा प्रयत्न ते करतात. आपण 1 हजार 954 कोटी रुपयांचं वाटप महाष्ट्रातील विविध भागात करतोय. त्यातील 965 कोटी रुपयांची मदत याआधीच शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम चालू आहे”, असंही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

NewsToday24x7

Next Post

भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा कॅसिनो खेळतोय? संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे खळबळ

Mon Nov 20 , 2023
मुंबई :- खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. संजय राऊत यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय. या फोटोमधील व्यक्तीने एका रात्रीत 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊतांनी केलाय. “हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असा सवाल संजय राऊत यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com