-एखाद्या पुस्तकाच्या शीर्षकात शक्ती असा शब्द लिहिला असेल तर ते पुस्तक घेण्यासाठी उड्या पडतात. शक्तीसाठी लोक ते पुस्तक वाचतील. हे सामान्य आणि नैसर्गिकच आहेत. यात नवीन काही नाही. परंतु तुम्हाला एकाग्र व्हायचे असेल तर योगमार्गात अनेक पद्धती आहेत. भौतिक कल्याणासाठी ते वापरता येऊ शकतात. परंतु त्याचा खूप फायदा नाही. आध्यात्मिक मार्गासाठी याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. शक्ती आणि यशाच्या मागे लागण्यापेक्षा भौतिक आणि आध्यात्मिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला तर अधिकच चांगले.
-मोक्ष प्राप्त करून पु्न्हा परमात्म्यात विलीन होण्याचा खटाटोप कशासाठी?
-गुरुत्वाकर्षणवर विश्वास आहे की नाही? तुमचा विश्वास असेल तरच गुरुत्वाकर्षण असेल का? तुमचा विश्वास असो की नसो, जे आहे ते आहेच. जे आहे ते आपल्याला मान्य करावेच लागेल. माझ्या आतमध्ये जे आहे, त्याचा शोध आधी घ्यावा लागेल. परंतु ज्यावेळी जे आवश्यक आहे, तेवढाच विचार आधी केला पाहिजे. छातीत तीर घुसला असेल आणि त्यावेळी तीर काढण्याऐवजी तीर कुठून आला, कुणी मारला असा विचार केला तर? तीर काढल्यानंतर पुढील विचार करता येईल. असे अनेक वैश्विक गूढ आहेत, जे तुम्हाला समजावून सांगता येत नाही.
-गुरुचा शोध कसा घ्यावा आणि योग्य गुरू कसे मिळतील?
-तुम्ही आज गुरुच्या शोधात जंगलात किंवा हिमालयात गेलात तर तिथेही तुम्हाला गुरू सापडणार नाही. तिथे गुरू मिळतीलच याची खात्री नाही. तुम्ही खरोखरच तळमळीतून गुरूचा शोध घेत असाल तर देव तुमची त्यासाठी मदत करणार म्हणजे करणार. तुम्हाला तळमळ किती आहे, यावर ते अवलंबून आहे.
-साधनेचे अनेक मार्ग आहेत, भक्ती मार्ग, ध्यान मार्ग वगैरे. माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता हे कसे कळेल?
-तुम्ही योग पण करा, ध्यान पण करा. परंतु हृदयात भक्ती असली पाहिजे. भक्ती नसेल तर तुम्हाला हवे ते प्राप्त होणारच नाही. मोक्ष हृदयाशी संबंधित आहे. मेंदूशी नाही. पद्धती कोणतीही असली तरी चालेल. प्रेम मात्र असले पाहिजे.
–मोक्षाची वेगवेगळी परिभाषा आहे. मोक्षाची इच्छा करणे ही सुद्धा एक मायाच आहे. माया असेल तर मोक्ष कसा मिळेल? सर्वांनाच मोक्ष कसा प्राप्त होईल?
-मोक्षाची इच्छा करणे ही माया नाहीच. मोक्षाची इच्छा करणे हे मायापासून वाचण्याची इच्छा आहे. दोन्ही एक नाही. प्रत्येक जण मोक्षप्राप्तीची इच्छा करीत नाही. खाण्या-पिण्याच्या बाबतीत विचार करतील. मोक्ष मात्र प्रत्येक जण प्राप्त करू शकतो.