गडचिरोली जिल्हयात आज 88 कोरोनामुक्त, नवे 221 कोरोनाबाधित

-सतीश कुमार ,गडचिरोली

एनीमीया आजाराने ग्रस्त एका व्यक्तीचा कोविडने मृत्यू

गडचिरोली,(जिमाका)दि.21: आज गडचिरोली जिल्हयात 1027 कोरोना तपासण्यांपैकी 221 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 88 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32592 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30752 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1088 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील 40 वर्षीय पुरुषाचा (एनीमीया आजाराने ग्रस्त ) समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 752 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.34 टक्के तर मृत्यू दर 2.31 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 88,अहेरी तालुक्यातील 03,आरमोरी तालुक्यातील 14, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 11, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 07, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 25,सिरोंचा तालुक्यातील 04, आणि वडसा तालुक्यातील 24 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 88 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 47,अहेरी तालुक्यातील 12,आरमोरी तालुक्यातील 02,भामरागड तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 03, सिरोंचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 05,आणि वडसा तालुक्यातील 09 जणाचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

Fri Jan 21 , 2022
-सतीश कुमार ,गडचिरोली लाभासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.21: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक, स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनाचे ब्रॅण्डिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com