पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई :- पूर्व-विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान द्वारे रक्तदान शिबीर थाटात संपन्न

Fri Feb 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान अंतर्गत जिल्हा सेवा समिती नागपुर व तालुका सेवा समिती पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन रक्तदान शिबीराची सुरूवात करण्यात आली. लाईफ लाईन ब्लड बैंक च्या डॉ. प्रीती बांबल, डॉ. प्रविण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!