मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
दोन आरोपीस पकडुन कोळसा व व्हँन असा ५०६४० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत रायनगर येथील विकास शाळे जवळील झाडी झुडपात २५ ते ३० बोरे अवैध कोळसा मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिकाऱ्यांनी व कन्हान पोलीसांनी संयुक्त कारवाई करित दोन आरोपी व मारोती व्हँनला ताब्यात घेत कोळसा व वाहनासह एकुण ५०,६४० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.९) फेब्रुवारीला दुपारी १ वाजता वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे आणि कन्हान पोस्टे चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सपोनि सतीश मेश्राम, हे काँ मुदस्सर जमाल, वैभव बोरपल्ले, सम्राट वनपर्ती, हरिश सोनब्रदे, एनपी सी महेंद्र जळीतकर, प्रविण चव्हान आदि कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली कि विकास शाळेजवळ दोन ईसमांनी मारोती व्हॅन क्रमांक एम एच ३१ सी एन ७०४१ मध्ये चोरीचा कोळसा भरला आहे. अश्या माहितीने वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे आणि कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन त्या दोन इसम व मारोती व्हॅन क्र. एम एच ३१ सी एन ७०४१ दिसल्याने रविकांत कंडे आणि पोलीसांनी त्यांना पकडुन नाव, गाव विचारले असता १)देवनाथ प्रकाश वाडीभस्मे,२) सुरेश लिल्हारे दोन्ही राह. कांद्री असे सांगितले असता पोलीसांनी मारोती व्हॅन वाहनाची पाहणी केली असता वाहनात २५ ते ३० चोरी केलेल्या कोळस्याच्या बो-या आढळुन आल्या. सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांनी सदर कोळसा वेकोलि खुली खदान वजन काट्यावर नेऊन वजन केले असता ३४४० किलो भरला. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळुन २५ ते ३० बोरे दगडी कोळसा किंमत अंदाजे २०६४० रुपये व मारोती व्हॅन किंमत ३०,००० रु असा एकुण ५०,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोस्टे फिर्यादी रविकांत कंडे यांचे तक्रारीने आरोपी १) देवनाथ प्रकाश वाडीभस्मे,२) सुरेश लिल्हारे विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सपोनि सतीश मेश्राम सह पोलीस कर्मचारी करित आहे.