मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
कन्हान (नागपुर) : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत फुकट नगर कांद्री येथे सहा आरोपींनी कोळसा चोरुन विकण्यासाठी जमा करुन ठेवल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांनी पकडुन कन्हान पोस्टे ला तक्रार केल्याने कन्हान पोलीसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरु केला आहे.
शनिवार (दि.१४) जानेवारीला रात्री ११ वाजता दरम्यान वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे वय ४५ वर्ष हे आपल्या सुरक्षा रक्षकासह वेकेलि कामठी परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, फुकट नगर कांद्री येथील झाडा झुडपात अवैध कोळसाचा साठा पडुन आहे. अश्या विश्वसनीय माहितीने रविकांत कंडे यांनी आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी जाऊण पाहणी केली असता तेथे चोरीचा कोळसा आढळुन आला. सदर चोरीचा कोळसा बाबत तपास घेतला असता आरोपी १) योगेश हरीचंद्र प्रजापती, २) हर्षल श्रीराम केवल ३) आर्यन अशोक झोड ४) अमन सुखा बरमाते ५) राकेश पंडीत ६) देवदास सोनवने, सर्व रा.फुकट नगर कांद्री कन्हान यांनी कोळसा कोणाला तरी विकण्यासाठी जमा करुन ठेवला असल्याची माहीती मिळाली. रविकांत कंडे यांनी सदर कोळसा पिकअप गाडीचे साहाय्याने कामठी ओसीएम काटयावर वजन केले असता त्याचे वजन ३२०० किलो भरले प्रति किलो ०८ रु. प्रमाणे असा एकुण २५,६०० रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांच्या ताब्यातुन जप्त केला असुन तो मुद्देमाल कामठी खुली कोळसा खदान यार्ड येथे जमा करण्यात आला.
सदर प्रकरणी वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारी केल्याने कन्हान पोलीसांनी सहा आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझेले हे करित आरोपीचा शोध घेत आहे.