साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :- भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातील ७५ ते ९९ टके प्रगती पथावरील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित कराव्या,तसेच या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना पूर्ण न होण्यास जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक करावी कारवाई करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

साकोली विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार नाना पटोले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे संचालक ई.रवींद्रन, सहसचिव बी जी पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, भंडारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, भंडारा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थिती आणि प्रगती पथावरील योजनांची भौतिक प्रगती पाहता या योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतील योजनांची स्थिती ,जिल्हा परिषदेच्या मंजूर पाणीपुरवठा योजनेची स्थिती, शंभर टक्के कार्यवाहीत घरगुती नळ जोडणी, जिल्हा निहाय हर घर जल सद्यस्थिती, जलजीवन मिशन सुधारित योजना, खर्चाची सद्यस्थितीचा आढावा मंत्री पाटील यांनी यावेळी घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

OCW & NGO Aroha Celebrates Water Day with Engaging Awareness Programs...

Tue Mar 25 , 2025
Nagpur :- On the occasion of World Water Day on 22 March 2025, OCW and NGO Aaroha organized a water day program to highlight the importance of water conservation and environmental sustainability. The event, held at the Indian Water Works Association, was attended by environmentalists from NGO Aroha, as well as principals, and students from Sanjay Nagar Hindi Madhyamik School […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!