– विविध जलजागृतीपर कार्यक्रमांचे होणार आयोजन
नागपूर :- सर्वसामान्यांमध्ये जलजागृती व्हावी यासाठी दरवर्षी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा 16 ते 22 मार्चदरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम, जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्य, रॅली, जलप्रतिज्ञा, विविध स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत जलजागृती सप्हाताचे नियोजन, अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी महामंडळ स्तरावर एका समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीची बैठक आज सिंचन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सप्ताहाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
सचिव प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ राजेंद्रकुमार मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मोहिते ऑनलाईन उपस्थित होते. मुख्य अभियंता गोसीखुर्द प्रकल्प आ.तु.देवगडे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर डॅा.प्र.खं.पवार, नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) कार्यकारी अभियंता रा.ना. ढुमणे, पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, अशासकीय सदस्य तथा जल अभ्यासक डॅा. प्रवीण महाजन बाणाई संस्थेचे अध्यक्ष अरविंद गेडाम प्रत्यक्ष तर विदर्भातील विविध जिल्ह्यातील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, अशासकीय सदस्य आनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थी हा घटक या संपूर्ण जलजागृती सप्ताहामध्ये केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळे या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे. 22 मार्च रोजी समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती राहावे, अशी त्यांना विनंती करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान 20 मार्च रोजी अंबाझरी ते फुटाळा तलाव स्कुटर रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या 25 वर्षापासून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
बैठकीदरम्यान अशासकीय सदस्यांनीही आपले विचार व्यक्त करीत सूचना केल्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून यादरम्यान शहरातील 75 शासकीय कार्यालयातील पाणी गुणवत्ता तपासणी करावी अशी सुचना यावेळी करण्यात येणार आली. यासह इतरही सूचनांचा अंतर्भाव हा सप्ताहाच्या नियोजनादरम्यान करण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.