– लकडगंज झोन अंतर्गत स्थावर मालमत्ता जप्ती मोहीम
नागपूर :- नागपूर महानगरपालिका लकडगंज झोन कार्यालयाच्या मनपा वसुली पथकाद्वारे थकबाकी मालमत्ता कर धारकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील थकीत मालमता कर वसुली संदर्भात जनजागृती व कार्यवाही केली जात आहे. त्यानुसार, लकडगंज झोन कार्यालयाद्वारे मौदा येथे असलेल्या एकूण ७ थकीत मालमता धारकांवर वारंट कार्यवाही करून २३ लाख ६० हजार ४८९ रुपयेची वसुली करण्यात आली.
लकडगंज झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्र. सहायक अधिक्षक भूषण मोटघरे, कर निरीक्षक मनीष तायवाडे, लालप्पा खान, राकेश सहारे, अमित पाटील, नाकिब खान, कर संग्रहक आशिष ठाकरे, अभिषेक कांबळे यांच्याद्वारे मौजा पारडी वार्ड क्र. २१ येथील घर क्रमाक १२९५/a/d ना.सु. प्र आणि सचिव अंड गुरु गणेश को.ऑप हाउसिंग सोसायटी लि. यांच्याकडून थकीत रक्कम रुपये १ लाख, ५१ हजार २२९, घर क्रमांक १२२७/a विजय वालदे, शरद वालदे, सुनील वालदे यांच्याकडून थकीत रक्कम रुपये ५८ हजार ४६९, घर क्रमांक १२०१/२३९+२३९a शुभंमंगल भाऊ बजरंजलाल भाऊ नंदलाला भाऊ लालचंद बंकटलाल मालू (मुरली इंडस्ट्रीज) यांच्याकडून थकीत रक्कम रुपये २ लाख १७ हजार ७२२, घर क्रमांक ५९४/२४३ श्री. दिबलसिंग गुरुदीपसिंग सोखी(सरजा बार) यांच्याकडून थकीत रक्कम रुपये 12 लाख ६८ हजार ५६५ आणि मौजा भरतवाडा घर क्रमांक ८९७ चंद्रभान बकाराम ढीवर यांच्याकडून थकीत रक्कम रुपये २ लाख ४० हजार ८३०, घर क्रमांक ८७३/c/९९ विठ्ठल सदाशिव वाठ आणि धनलक्ष्मी गृह निर्माण सह.संस्था यांच्याकडून थकीत रक्कम रुपये २ लाख ६२ हजार ८७०, घर क्रमांक ८८७/२९१+२९२+२९३+२९४ धनेश चिंताराम चंगेल यांच्याकडून थकीत रक्कम रुपये १ लाख ६० हजार ८०४ असे एकूण २३ लाख ६० हजार ४८९ वसुली जप्त करण्यात आली