वारेगाव एश डेम्प फूटल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वारेगाव येथे राखमिश्रित एश डेम्प फुटल्याने वारेगाव सह नजीकच्या शेतातील परिसर राखमीश्रित जलमय होत हे राखमिश्रित पाणी शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले.ही घटना आज सायंकाळी 5 दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अक्षय पोयाम सह संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.मात्र या एश डेम्प मधून आलेले राखमिश्रित पाणी चा स्त्राव थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे कसोशीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर यशप्राप्त झाले व पाण्याचा स्त्राव थांबविण्यात यश मिळाले मात्र तोवर हे राखमीश्रित पाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

मागील वर्षी कोराडी औष्णिक विद्दूत केंद्रातून निघनारी राखबंधारा खसाळा- म्हसाळा गावातुन फुटल्याने राखमिश्रित पाणी येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले होते मात्र योग्य तशी नुकसानभरपाई वितरित करण्यात आली नाही तसेच यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर आज वारेगाव राख बंधारा फुटल्याने येथील राखमिश्रित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने झालेल्या नुकसानधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा प्रशासन विरोधात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

Thu Jul 20 , 2023
– मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव अभिवादन प्रस्ताव मुंबई :- मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत मांडला त्यावेळी ते बोलत होते. स्मृती स्मारक उभारणार मराठवाडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com