कामठी नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयुक्तांकडे सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र – आगामी काळात होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणूक संदर्भात कामठी नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर घेतलेल्या 47 आक्षेपावर 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली त्याच हरकती व सूचना अनुषंगाचा अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असून त्यामुळे कामठी शहरातील राजकीय पक्षाची नजर आता 7 जून रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम प्रभाग रचनेकडे लागली आहे.सात जून ला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागातील आरक्षणा संदर्भात निवडणूक आयोग लवकरच तारीख घोषित करणार व जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयापर्यंत आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या जागावर आरक्षणाची सोडत होणार आहे परंतु अद्यापही ओबीसी आरक्षणा बाबतीत निर्णय झाला नसल्याने निवडणुकीत ओबीसी आरक्षण राहील किंवा नाही ही येणारी वेळच सांगणार आहे.
सात जून रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर नगर परिषद च्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्च महिन्यात रद्द करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा सुरू करण्यात आला होता त्यानुसार 10 मे ते 14 मे पर्यंत प्रसिद्ध झालेंल्या प्रभाग रचनेवर 47 आक्षेपकर्त्यांनी आक्षेप नोंदविला गेला होता त्यावर 23 मे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुद्धा झाली आता या प्रभाग रचनेवर घेतलेले आक्षेप मंजूर होतील का?किंवा प्रभाग रचना जैसे थे राहणार?याकडे राजकीय पक्षाच्या नजरा लागल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाघोली येथे घराच्या दाराचे कुलुप तोडुन घरफोडी

Wed Jun 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी सोने, चांदीच्या दागिने सह नगदी ४ हजार रू असाएकुण १६,७०० रुपयाच्या मुद्देमालाची चोरी. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १० कि मी अंतरावर वाघोली येथे अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधुन दाराचे कुलुप तोडुन आलमारी तील सोने, चांदीच्या दागिन्यासह नगदी ४ हजार रू. असा एकुण १६,७०० रूपयाचा मुद्देमाल चोरी करून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com