अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील मौजा लहीटोला पो.पांढराबोडी येथील तक्रारदार शेतकरी असुन त्यांच्याकडे वडीलांकडे स्वस्त धान्य दुकान आहे.त्यांना कर्क रोग असल्याने प्रकृती बरी राहत नसल्याने तक्रारदाराने वडिलांचे नावे असलेले स्वस्त धान्य दुकान ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक कागदपत्र सह पुरवठा विभाग तहसील कार्यालय गोंदिया येथे अर्ज सादर केला होता.
तहसील कार्यालयात 27 जुलैला तक्रारदार गेले असता पुरवठा विभाग निरीक्षक पंकज शिंदे यांनी नावावर ट्रान्सफर करण्याकरिता 5 हजार रूपयांची मागणी केली.परंतु तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यांनतर आज 29 जुलैला पहीला माळा प्रशासकीय इमारत गोंदिया येथे तक्रारदार हस्ते 4 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पंचा समक्ष पुरवठा निरीक्षक पंकज शिंदे तहसील कार्यालय गोंदिया याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन गोंदिया येथे कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई राकेश ओला, पोलिस अधीक्षक ,मधुकर गिते अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम अहीरकर उप अधीक्षक सह त्यांचा पोलिस शिपाई चमुने कारवाई केली आहे.