नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत सिरसपेठ, ईमामवाडा, नागपुर येथे एका संशयीत ईसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सौरभ प्रमोद बोरकर, वय २४ वर्षे, रा. गुलाबचाचा झोपडपट्टी, सिरसपेठ, ईमामवाडा, नागपूर असे सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यातुन ०५ ग्रॅम एम. डी. पावडर मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम. डी. पावडर, एक मोवाईल फोन, एक मोटरसायकल वाहन असा एकुण १,१०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस अधिक विचारपुस केली असता, आरोपी हा त्याचा साथीदार पाहिजे आरोपी नामे सुजल मंगेश पानतावणे, रा. सिरसपेठ, ईमामवाडा, नागपुर याचे मदतीने स्वतः ये आर्थिक फायद्याकरीता एम.डी. पावडर विकी करण्याकरीता बाळगल्याचे सांगीतले. आरोपीचे कृत्य हे कलम ८ (क), २२(क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपोंविरूध्द पोलीस ठाणे ईमामवाडा येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. व त्यामध्ये आरोपी सौरभप्रमोद बोरकर, वय २४ वर्षे, यास अटक करण्यात आली होती. व पाहिजे आरोपी सुजल पानतावणे याचा शोध सुरू होता.
दिनांक २०.०२.२०२५ रोजी गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी, मिळालेले खात्रीशीर माहितीवरून वर नमुद गुन्हयात पाहिजे आरोपी नामे सुजल मंगेश पानतावणे वय २० वर्ष रा. सिरसपेठ, ईमामवाडा, नागपूर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन ईमामवाडा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.