यवतमाळ :- वय वर्ष 85 वरील मतदार व दिव्यांग मतदारांना घरीच मतदान करता येणार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात दि.14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान मतदान पथकाद्वारे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे.
यवतमाळ विधानसभा मतदार संघातील वय वर्षे 85 वरील मतदार व दिव्यांग मतदार मतदारांच्या घरी जावून दि.14 ते 16 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत संबंधित नियुक्त मतदान पथकाद्वारे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पोस्टल बॅलेट पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. ज्या मतदारांनी नमुना 12 डी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत या सादर केले आहे. त्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी वरील कालावधीत अर्जात नमुद केलेल्या पत्यावर उपस्थित राहुन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन यवतमाळच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.