नागपूर शहराच्या विकास प्रवाहाला नवी दिशा  सरत्या वर्षातील मनपाच्या कार्याचा आढावा

नागपूर : मावळत्या वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विविध प्रकल्प, विकास कामे यासोबत नागरी सुविधांसाठी निर्माण झालेल्या यंत्रणेमुळे नागरिकांना नवी सुलभता प्रदान करण्यात आली. २०२२ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ठरले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या पूर्ततेबद्दल संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. २०२२च्या वर्षाअखेर नागपूर शहरातील महत्वाकांक्षी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या कोनशिलेचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले. या अनावरणासह शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शहर विकासाच्या प्रवाहाला नवी दिशा मिळाली आहे.

२०२२ या मावळत्या वर्षात नागपूर महानगरपालिकेतील काही ठळक घडामोडींचा हा सविस्तर आढावा…

लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची सांगता

नागपूर शहराची पालकसंस्था असलेल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये २०२२ मध्ये महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. त्यातील महत्वाचे म्हणजे, लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची सांगता. २०१७ ला श्रीमती नंदा जिचकार यांच्या महापौर पदाच्या नेतृत्वात प्रशासकीय कामकाज सुरू झाले. पुढे श्री. संदीप जोशी यांनी सांभाळले व २०२२ ला श्री. दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वासह लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची सांगता झाली. अनेक महत्वाच्या संकल्पना मांडून त्या पूर्णत्वास नेण्याचे कार्य २०२२ मध्ये माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. ४ मार्च २०२२ रोजी नागपूर महानगरपालिकेमध्ये भव्य नागरी सत्कार कार्यक्रमासह सर्व लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची सांगता झाली.

आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती

४ मार्च २०२२ रोजी लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाची सांगता झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्यावर आली. राज्य शासनाद्वारे त्यांची नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. प्रशासक म्हणून आयुक्तांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. नागरी सुविधांच्या तक्रारींसाठी महत्वाचे पुढाकार घेउन यंत्रणा बळकट केली. आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना भेडसावणा-या समस्यांसाठी झोन स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात नागपूर शहराने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा अनुभवला.

पंतप्रधानांनी केले नाग नदी प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या कोनशिलेचे ११ डिसेंबरला अनावरण झाले. संपूर्ण नागपूर शहरासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १९२७ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून १११५.२२ कोटी, राज्य शासनाकडून ५०७.३६ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे ३०४.४१ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १३१८६१ घरांना सिवर नेटवर्कमध्ये जोडण्यात येईल.

बुस्टर डोस लसीकरणाला सुरूवात

२०२१मध्ये कोरोनाच्या संसर्गापासून निर्माण झालेला धोका लक्षात घेता मनपाद्वारे लसीकरणावर भर देण्यात आला. १० जानेवारीला नागपूर शहरात बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरूवात झाली. तत्कालीन पालकमंत्री डॉ. नितीन राउत यांनी स्वत: बुस्टर डोस घेउन या लसीकरण अभियानाची सुरूवात केली होती. याशिवाय मनपाद्वारे वारंवार लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. त्याचे परिणाम म्हणजे, नागपूर शहरात पहिला डोस घेणा-यांचे प्रमाण १०० टक्क्यांच्यावर पोहोचले. नागपूर शहरात कोरोनाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा वर्षभर सज्ज दिसून आली. याच वर्षात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या कोर्बेव्हॅक्स लसीकरणाला १७ मार्चपासून सुरूवात झाली. शहरातील लसीकरण वाढावे व नागरिक सुरक्षित रहावेत यासाठी मनपा आयुक्तांद्वारे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली.

भिंतींवर झळकली शहरातील कला

नागपूर शहरात विविध भागात असलेल्या शासकीय, निमशासकीय संस्थांच्या भिंती आता बोलक्या झालेल्या आहेत. विविध संदेशासह कलात्मकरित्या या भिंती पाहणा-यासोबत बोलू लागल्या आहेत. नागपूर शहरातील कलावंतांनी एकत्र येत आपल्या कलेच्या माध्यमातून अस्वच्छ भितींना नवरूप प्रदान केले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात शहर सौंदर्यीकरणांतर्गत घेण्यात आलेल्या ‘वॉल पेंटिंग’ स्पर्धेचे हे फलीत आहे.करणारी नागपूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापुढे नामफलक

भारतीय स्वातंत्र्य गौरवशाली लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यात नागपूर शहरातील योद्ध्यांचे योगदान मोठे आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा सन्मान करतानाच त्यांच्या परिवाराचे आभार मानावे व या माध्यमातून आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती शहरातील नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अभिनव संकल्पना मांडली. महापौरांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या नागपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापुढे नामफलक लावण्यात आले. त्याची सुरूवात नवाबपुरा येथील शहिद शंकरराव महाले यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली.

टॅब देण्यात आले. ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेता यावे, शिकवणी वर्गाव्यतिरिक्त घरी सुद्धा विविध शैक्षणिक अप्लिकेशनच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी त्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना नीट, जेईई आणि एन.डी.एसचे प्रशिक्षण दिल्या जात आहे.

सफाई मजदूर पदावर ९२ वारसदारांना स्थायी नियुक्ती

स्वच्छ, सुंदर नागपूर ही शहराची छबी कायम ठेवण्यासाठी सातत्याने स्वच्छतेचे सेवाकार्य बजावणा-या ९२ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपामध्ये स्थायी नियुक्ती देण्यात आली. वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र प्रदान केले.

पहिल्या आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे पहिल्यांदाच आरोग्य पुस्तिका तयार करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. ‘नववर्षाचे नवचैतन्य, स्वच्छता आणि आरोग्यास देऊ प्राधान्य’ या घोषवाक्यासह नागपूर महानगरपालिकेची ही नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी नववर्षाची पुस्तकरूपी नवसंकल्पना आरोग्य विभागाद्वारे मांडण्यात आली आहे.

वंदे मातरम्’ उद्यानाचे भूमिपूजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून तत्कालीन महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून बजेरिया येथे एम्प्रेस मॉल समोरील जागेत साकारणा-या भारतीय सेनेतील सर्वोच्च परमवीरचक्र पुरस्कार प्राप्त जवानांना समर्पित ‘वंदे मातरम्’ उद्यानाचे या वर्षात भूमिपूजन झाले. कारगील युद्धातील हिरो परमवीरचक्र योगेंद्र सिंह यादव यांच्या विशेष उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा झाला. वंदे मातरम् उद्यानात देशातील २१ परमवीरचक्र प्राप्त जवानांचे म्यूरल आणि त्यांनी योगदान दिलेल्या युद्ध प्रसंगांचे वर्णन केले जाणार आहे.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नवरात्री ते दीपावली दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात १८ वर्षावरील महिलांच्या तपासणीबाबत व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील विविध भागात राबविण्यात आलेल्या महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अभियानाचा २६३४१०हजार महिलांनी लाभ घेतला.

झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्र

नागरी समस्यांसाठी मनपाद्वारे दहाही झोनमध्ये नागरी समस्या निवारण केंद्रांची स्थापना करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध होण्यासंदर्भात झोनस्तरावर पूर्णवेळ स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष शहरातील नागरिकांना भेडसावणा-या नागरी मुलभूत समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरावे या उद्देशाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार प्रत्येक झोनमध्ये ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ स्थापन करण्यात आले.

कोराडी तलावात मोठ्या मूर्तींचे विसर्जन

कोरोनाच्या संकटानंतर यावर्षी निर्बंधमुक्तीसह उत्सव साजरे झाले. गणेशोत्सवात यंदा निर्बंध नसले तरी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. नागपूर शहरातील सर्व तलाव मूर्ती विजर्सनासाठी बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ४ फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथील विशाल कृत्रिम तलावात करण्यात आली होती.

राज्यातील पहिले एमएमडीपी क्लिनिक नागपुरात

नागपूर महानगरपालिकेतर्फे मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे MMDP क्लिनिक (Morbidity Management and Disability Prevention)/ हत्तीरोग व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MMDP क्लिनिक सुरू करणारी नागपूर महानगरपालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. या क्लिनिकचे उद्घाटन मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे भूमिपूजन

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दक्षिण नागपूरमध्ये नव्याने विकसित झालेल्या व जलवाहिन्या नसलेल्या भागांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ३४ मध्ये मेहरबाबा नगर चिखली(खुर्द) येथे भारतातील पहिल्या डबल डेकर जलकुंभाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

ऐतिहासिक स्थळांच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या स्ट्रीट फॉर पीपल अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना महाल येथील जुन्या ऐतिहासिक स्थळांची, हेरिटेज इमारतींची माहिती व्हावी या उद्देशाने हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांनी श्रीमंत राजे मुधोजी भोसले, युवराज जयसिंग भोसले, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्यासह परिसरात हेरिटेज इमारतींची पाहणी केली.

कोरोना संभाव्य धोक्यासाठी मनपा सज्ज

दोन वर्ष हाकाहाकार माजविणा-या कोरोनाला थोपविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा बळकट करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले. मार्च-एप्रिलमध्ये उत्तर भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच नागपूर महानगरपालिकेद्वारे संभाव्य धोका रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली. यानंतर डिसेंबरमध्ये कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे संकेत मिळताच केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली. चाचणी केंद्र, लसीकरण केंद्रांना कार्यान्वित करून नागरिकांना आवाहन करण्यात आले. शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील बेड्सची संख्या, ऑक्सिजन प्लाँटची व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. स्वत: अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांच्या उपस्थितीत अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या संदर्भात व्यवस्थेबाबत मॉकड्रिल घेण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com