लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी आवश्यक – जिल्हाधिकारी

नागपूर :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार हा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदार नोंदणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व मानव विकास सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथील नेहा प्राथमिक विद्यालयात मतदार नोंदणी व विविध प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, नायब तहसीलदार रमेश पागोटे, मानव विकास सेवा बहुउद्देशिय संस्थेचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार, शंकर इनवाते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत यावेळी उपस्थित होते.

शिबीरात भटक्या, विमुक्त जाती, अनुसूचित जाती, जमाती, मांग गारुडी समाजाच्या कुटुंबातील वंचित घटकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व नागरिकांना व्हावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

आरोग्य विभाग, सजंय गांधी निराधार योजना, महसूल विभाग, निवडणूक शाखेने स्टॉल लावून नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला असून त्यामध्ये आधार कार्ड-139, जातीचे प्रमाणपत्र-31, उत्पनाचे दाखले-9, शिधापत्रिका-9, रहिवासी दाखले-110, वयाचे दाखले 95 दिले असून निवडणूक शाखेने 92 मतदारांची नोंदणी यावेळी केली. या शिबिराला कन्हान व परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाचा विजयारंभ गोव्यावर २-१ अशी मात; अक्षता, प्रियांकाचा एकेक गोल

Wed Nov 1 , 2023
मापुसा :-अक्षता ढेकळेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने यजमान गोव्याला २-१ असे हरवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अभियानाला विजयाने आरंभ केला. मापुसा येथील पेड्डीम क्रीडा संकुलात झालेल्या या ब-गटाच्या सामन्यात सातव्या मिनिटाला प्रियांका वानखेडेने मैदानी गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. दोनच मिनिटांनी अक्षताने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून महाराष्ट्राची आघाडी २-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com