तुझा आधार मला ।
तुच रे पाठिराखा ।
तुच रे माझा पाडुरंगा.
खरच….विठुरायाला बोलले हे शब्द आज एका कुटुबांलाही म्हणावे लागले ते व्हि.एन.रेड्डीसाठी, पश्चिम नागपूरातील पांढरांबोडी या झोपडपट्टीत राहणारे हे कुटुंब बिकीट परिस्थीती, धुनी-भांडी मोल मजुर करणारे हे दंपत्ती यातच मुलीचे लग्न, लग्न म्हटल की खरच इतके पैसे आणणार कुठुन हाच प्रश्न त्या दांपत्या समोर, लग्न २ ते ३ दिवसांनी, त्याच दांपत्या समोर हा गंभिर प्रश्न ? नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्हि.एन. रेड्डी ना ही बाब जेव्हा कळाली, तेव्हा ते धावून आले. ज्याप्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला सक्षमीकरण, सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नरत राहतात, आणि याच संकल्पनेतून बालिका अनुदान योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने प्रधानमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून प्रेरणा घेत रेड्डी यांनी कुटुंबाला आधार दिला, आर्थिक मदत केली. त्या दांपत्यानी व तेथिल नागरिकांनी व्हि.एन.रेड्डीचे आभार मानले. मदत मिळताच त्या कुटुबांच्या मुखातून एकच शब्द निघला. भेटला विठ्ठल मला भेटला विठ्ठल !