नागपूर :-राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने भाजप सरकार विरोधात आक्रोश दाखविण्यासाठी रस्त्यावर आंदोलनाने करून आदिमांचा आवाज बुलंद केल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारने ४५ जमाती पैकी हलबा,माना ,गोवारी ,धनगर,धोबा व ठाकूर या आदिवासी जमातीसह ३३ जमाती क्षेत्रबंधनाबाहेरील असल्याने या आदिम समाजाला संविधानिक न्यायापासून वंचित करून ठेवले आहे म्हणून हलबा समाजमध्ये प्रचंड असंतोष आहे. तथाकथित आदिवासी आमदारांचा दबावातून ३३ जमातीतील १ कोटी नागरीकांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती यादीतील ४५ जमाती पैकी सन १९७७ पूर्वीच्या क्षेत्रबंधनातील फक्त १२ जमातीच खरे आणि क्षेत्रबंधनाबाहेरील ३३ जमाती खोटे हा प्रकार संविधान विरोधी आहे. या भाजप सरकारच्या अन्यायाविरोधात राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौक, नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने जेष्ठ कामगार नेते विश्वनाथ आसई, जेष्ठ समाजसेवक दे. बा. नांदकर ,आदिम नेत्या ॲड. नंदा पराते,माजी उप महापौर दीपराज पार्डीकर, प्रकाश निमजे, बँक कर्मचारी नेते धनंजय धापोडकर, कर्मचारी नेते शिवानंद सहारकर ,ओमप्रकाश पाठराबे, कृष्णा गोटाफोडे, युवा नेते अभय धकाते, ओमप्रकाश शाहीर, पुरुषोत्तम सेलूकर, पुरुषोत्तम कांद्रीकर,हेमंत बरडे ,नागोराव पराते, महेश बारापात्रे, मुन्ना खडतकर,अश्विन अंजीकर, दीपक पौनीकर,चेतन निखारे, दीपक देवघरे, मंजू पराते, शकुंतला वट्टीघरे, वंदना पौनीकर, अनिता हेडाऊ, मंदा शेंडे, यांच्यसह शेकडो हलबा बांधावांनी नारे-निर्दशने केल्यामुळे गांधीबाग,इतवारी ,जगनाथ बुधवारी सह अनेक रस्त्यावरची वाहतूक व्यवस्था कोलमडली.
या आंदोलनात गर्व से कहो हम आदिवासी है.भारत के मूल निवासी है, जितनी जिनकी संख्या भारी हैं..ऊतनी ऊनकी भागीदारी हैं,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,आदिवासी हलबांना न्याय.मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे,आदिवासी हलबांना जमातीचे प्रमाणपत्र.मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे,शिक्षणाचे बाजारीकरन बंद करा, बंद करा महाराष्ट्र सरकार.हाय हाय…हाय हाय, केंद्र सरकार.हाय हाय..हाय हाय, जुमलेवाली ये सरकार..नही चलेगी अबकी बार, हलबांचे अमेडमेंट.झालेच पाहिजे,झालेच पाहिजे,बरछी , भाला, तीर कमान.आदिवासी एक समान असे गगनभेदी नारे देण्यात आले.
राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकात झालेल्या आंदोलनासाठी ॲड. राकेश पाठराबे,हरेश निमजे, दामोदर खडगी,भास्कर चिंचघरे,प्रकाश दुल्हेवाले,कैलास निनावे, रघुनंदन पराते,दिलीप खडगी, प्रदीप पौनीकर,मोरेश्वर पराते ,संजय बारापात्रे,विजय धकाते ,दिलीप बारापात्रे,चेतन निखारे,बळीराम पराते, ,दिलीप भानुसे, रमेश वडगांवकर,मिथुन निमजे ,देवराव उमरेडकर ,कृताल वेळेकर,मनोहर केळवदकर ,बबन हेडाऊ,गोपाळ पौनीकर,देवंद्र बोकडे, मीनाक्षीताई धकाते, सुषमा पौनीकर, सरिता बुरडे ,कल्पना मोहपेकर ,इंदिरा खापेकर ,माया धार्मिक ,अलका दलाल, ललिता पौनीकर,लता सुभेदार, शारदा खवास ,संगीता सोनक,कुंदा निनावे, शेवंता कोहाड यांनी अथक परिश्रम घेतले.