पांढरकवडा येथे शेतकरी गटाचे गाव स्तरीय शेतकरी प्रशिक्षण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने, दिनांक 01/ 3/ 2024 रोजी, मौजा पांढरकवडा , ता कामठी, जिल्हा नागपूर येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 23 – 24 अंतर्गत शेतकरी गटाचे गाव स्तरीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यांत आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेंद्रिय शेती तज्ञ  विकास येळणे उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या सुरूवातीला कृषी पर्यवेक्षक श्री. विलास गावंडे यांनी नैसर्गिक शेती मिशनची संकल्पना व उद्दिष्टे प्रास्ताविकेतून मांडली.

प्रमुख मार्गदर्शक विकास येळणे यांनी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा घरच्या घरीच तयार करण्याच्या पद्धती, त्यामध्ये प्रामुख्याने कम्पोस्ट खत, हिरवळीचे खत, जीवामृत, अमृत पाणी, माती परीक्षण. व नमुना घेण्याची पद्धत, बिजामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र तयार करण्याच्या पद्धतीबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन नाशिक जांभुळकर, स. तं. व्य.(आत्मा ) यांनी केले नैैगि॔॔क शेती मिशन बाबत माहीती , संकल्पना व उद्दिष्ट शेेतक-यांना समजाउन सांगीतले आभार कृषी सहायक अश्विनी साखरे यांनी व्यक्त केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी गीता कडु व बबन गडमडे यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे,विक्री ,बाजारभाव,साठवणूक,नैसर्गिक शेती फायदे तसेच रासायनिक शेतीपासून होनारे नुकसान बाबतीत माहिती दिली.कु. दर्शना नाटकर तंत्र सहाय्यक यांनी या प्रशिक्षणाला सहकार्य केले. शिवराय शेकरी स्वयंसहायता गट, पांंरकवडा अध्यक्ष अमोल ठाकरे सचिव बाबाराव ठाकरे, पोलीस पाटील अनिकेत रेवतकर, पं.स.कामठी बाजार समिती सदस्य सचिन घोडमारे तसेच गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय युवा आदान - प्रदान कार्यक्रमांतर्गत बांगलादेश युवा सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Sat Mar 2 , 2024
मुंबई :- भारत व बांगलादेशातील नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य, मैत्रीपूर्ण संबंध तसेच सहकार्याची भावना वाढविण्याच्या दृष्टिने केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून भारतभेटीवर आलेल्या बांगलादेशातील 100 युवा प्रतिनिधींनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. आंतरराष्ट्रीय युवा आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. बांगलादेशच्या मुक्ती लढ्यापासून भारताचे बांगलादेशशी मैत्रीपूर्ण संबंध असून हे संबंध काळाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights