नागपूर :- देशाचे व्हिजनरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’ या उक्तीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाभरातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी, त्यांच्या विकासाच्या आणि कल्याणाच्या योजना आखल्या आणि सर्वसामान्यांपर्यंतही ज्या पद्धतीने या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचला त्याचेच फलीत जनतेने आपल्या विश्वासातून व्यक्त केले आहे.
मागील साडेनऊ वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थ नीती, शिक्षा नीती, विदेश नीती आणि सामाजिक जाण असलेल्या नीतीमुळे त्यांनी जगाच्या परिपेक्षात भारताची प्रतिमा उंचावली आहे. २०१४ पासून आतापर्यंत सातत्याने त्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले, ज्या पद्धतीने ते देशातील सर्व परिस्थितींना सामोरे गेले. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखे सर्वसमावेशी कणखर नेतृत्व हेच देशाला पुढे नेऊ शकते हे जनतेने ओळखले आहे, हे या निकालातून स्पष्ट होत आहे. व जनतेने देखील ते स्वीकारले असल्याचे या निकालाद्वारे सिद्ध होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासाचे दूरदर्शी व्हिजन आणि भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक हा विजय असून तीनही राज्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी तमाम जनतेला धन्यवाद देतो.