नागपूर, दि. 29 : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे नागपूर विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या 74व्या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे-चवरे, एअर मार्शल पी. आर. मोहन, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर उपस्थित होते.
शहरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत दुपारी चारला भारतीय महसूल सेवेच्या 74व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप होत आहे.