संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कारच्या खिडक्यांच्या काचावर काळी फिल्म लावणे गुन्हा आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अशा वाहनावर कारवाही करता येते मात्र कामठी शहरात अशी वाहने मोकाट फिरत असून कामठी वाहतूक पोलीस विभागाने याकडे लक्ष देत नियम मोडणाऱ्या या वाहनावर कारवाही करणे गरजेचे आहे.
वाहनांच्या काचावर काळ्या फिल्म लावू नये असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत .वाहनावर पारदर्शी फिल्म लावल्या जाव्या असे स्पष्ट आदेश असूनसुद्धा कित्येक जण कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करून वाहनांच्या काचावर काळी फिल्म लावून फिरत आहेत. याकडे वाहतूक विभागाने लक्ष पुरवून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या वाहतुकदारांना कायद्याचा बडगा दाखवावा अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.