नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत प्लॉट नं. ७४२, आखरी बस स्टॉप, रमाबाई आंबेडकर नगर, जयताळा, नागपूर येथे राहणारे विजय चंद्रभान अन्ने, वय ४६ वर्षे यांनी त्यांची हीरो होन्डा मोटरसायकल क्र. एम. एच. ३१ बि.जे ८१६४ किमती २०,०००/- रु. ही पिंतावर अपार्टमेंट, प्लॉट नं. ७४, प्रतापनगर, नागपूर येथे ऑफीस समोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून व तांत्रीक तपास करून एका बिना नंबरप्लेट असलेल्या मोटरसायकल स्वार आरोपी राहुल सुखदेव ठाकरे, वय ३७ वर्षे, रा. सातनेर, ता. आठनेर, जि. बैतुल, म.प्र. ह. मु पाचझोपडा, राजिव गांधी शाळेजवळ, मिनीमाता नगर, कळमणा यांस ताब्यात घेवुन मोटरसायकल बाबत विचारपुस केली असता, आरोपीने वर नमुद गुन्हा केल्याने कबुली दिली. त्याचे ताब्यातून हीरो होन्डा मोटरसायकल क्र. एम. एच. ३१ वि.जे ८१६४ जप्त करण्यात आली. आरोपी जवळ ईतरही चाव्यांचा गुच्छा मिळुन आल्याने आरोपीस अधिक सखोल विचारपुस केली असता, त्याने पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीतून इतर तिन मोटरसायकली, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीतून चार मोटरसायकली तसेच पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतुन चार मोटरसायकली, पोलीस ठाणे यशोधरानगरीतून दोन मोटरसायकली व पोलीस ठाणे लकडगंज, हुडकेश्वर, वाठोडा तसेच वरूड, कळमेश्वर, नरखेड यांचे हद्दीतून प्रत्येक एक अशा एकूण १९ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने ताब्यातून नमुद मोटार सायकली जप्ती करण्यात आल्या. गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, एकूण २० मोटरसायकली, किमती १२,५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
वरील कामगिरी पोउपआ डिटेक्शन, सपोआ डिटेक्शन यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि सुहास चौधरी, सपोनि राजेन्द्र गुप्ता, प्रवीण महामुखी, पोहवा नितीन वासनिक, सुनीत गुजर, नुतनसिंग छाडी, नापोअ सुशांत सोळंके, शरद चांभारे, योगेश सातपुते, रितेश तुमडाम, सोनू भावरे, अजय शुक्ला, योगेश वासनिक, हेमंत लोणारे, मनोज टेकाम, पोअ रवि राउत, शिवशंकर रोठे चंद्रशेखर भारती यांनी केली..