नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत, वैष्णवी बिल्डींग ४ था माळा, टांगा स्टॅण्ड जवळ, तहसिल, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मुस्तफा अब्दुल हसन मुल्ला, वय ३८ वर्ष, यांनी त्यांची पेंशन प्लस गाड़ी कं. एम.एच ३१ बी. झेड ५४४६ किंमती ५०,०००/- रू. ची ही बिल्डींग जवळ पार्क करून, लॉक करून, ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे तहसिल येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून त्यांनी सापळा रचुन आरोपो नामे संदीप दुलीचंद धुर्वे वय १९ वर्ष रा. बसे गाव, ता. चांदटोला, जि. बालाघाट, मध्य प्रदेश यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली, आरोपीस अधीक विचारपुस केली असता त्यांनी वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे तहसिल हद्दीत पुन्हा एक वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन वरील गुन्हयातील चोरी केलेले वाहन पेंशन लस गाडी के. एम.एच ३१ बी. झेड ५४४६ तसेच पेंशन प्लस एम.एय ३१ बी.एम ५४११ असे ०२ मोटरसायकल किंमती अंदाजे १,००,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाई करीता तहसिल पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पौनि, मुकुंद ठाकरे व त्यांचे पथकाने केली.