नागपूर :- फिर्यादी राजेंद्रसिंग कर्नलसिंग जगदे, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १९५, बाबा जगदीपसिंग नगर, उप्पलवाडी, नागपुर यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी क. एम.एच. ४९ एस. १९३३ किंमती २०,०००/- रू. ची पोलीस ठाणे कळमना हद्दीत, जगदे मोटर्स, नाका नं. ५, पेट्रोल पंप जवळ, नागपुर पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे कळमना येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ५ वे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असता, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत मेकोसाबाग पुलाखाली एक ईसम संशयीत वाटल्याने त्यास ताब्यात घेवुन, त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव विशाल अशोक गजभिये, वय २८ वर्षे, रा. अशोक नगर, कन्हान, जि. नागपुर असे सांगीतले, त्यास त्याचे जवळील वाहनाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्याची सखोल विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली होन्डा शाईन गाडी क. एम. एच. ४९ एस. १९३३ किंमती २०,०००/- रू. जप्त करण्यात आली. आरोपीस मुद्देमालासह कळमना पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
२) गुन्हेशाखा युनिट क्र. ५ चे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असता, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत मेकोसाबाग हचिंग स्कुल समोर एक संशयीत ईसम विनानंबर ची लाल रंगाचे पेंशन प्रो वर दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव शुभम ज्ञानेश्वर वानखेडे, वय २९ वर्षे, रा. प्लॉट नं. ०६, सद्गुरूशरण सोसायटी, दत्तवाडी, नागपुर असे सांगीतले. त्याचे जवळील वाहनाबाबत विचारपुस केली असता, त्याने वर नमुद वाहन पोलीस ठाणे वाडी हद्दीत विकास नगर लिचडे ले-आऊट, शितला माता मंदीर जवळुन दिनांक ३१.१०.२०२४ रोजी चोरी केल्याची कबुली दिली, अभिलेख तपासला असता, पोलीस ठाणे वाडी येथे वाहन बोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली हिरोहोन्डा पेंशन प्रो गाडी क. एम. एन. ३१ व्ही. एस. ००९१ किंमती २०,०००/- रू. जप्त करण्यात आली, आरोपीस मुद्देमालासह वाडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा, पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल शिरे, पोउपनि. राहुल रोटे, पोहवा. राजेंद्र टाकळीकर, रूपेश नानवटकर, उपुलाल चुटे, राजुसिंग राठोड, चंद्रशेखर गौतम, नापोअं, गणेश ठाकरे, प्रमोद वावणे, अनिस खान, प्रविण भगत, पोअं, देवबंद धोटे, सुनिल यादव, दिपक बावणकर, योगेश महाजन व आशिष पवार यांनी केली.