राजधानीत 12-13 मार्च रोजी महिला चित्रकार मनाली बोंडे यांचे वसुधैव कुटुंबकम चित्र प्रदर्शन 

नवी दिल्ली :- विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने अमरावती येथील प्रसिद्ध युवती चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या वसुधैव कुटुंबकम या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे भरविण्यात येणार आहे.

चित्रकार मनाली बोंडे यांनी त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षापासून चित्रकलेची सुरूवात केली आहे. मागील 15 वर्षांपासून त्या चित्रकला क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. मनालीने एमबीए पदवी मिळवली आहे. राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या त्या कन्या आहेत.

कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया अशा परदेशातील अनेक देशांना भेटी दिल्यानंतर मनालीने त्या- त्या देशाचे विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली आहेत. भारताचे वैचारिक योगदान – वसुधैव कुटुंबकम यांनी या विचारसरणीचे आपल्या चित्र आणि प्रदर्शनातून कौतूक केले आहे. हे छायाचित्र प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स, दिल्लीच्या दर्शना 2 हॉलमध्ये सादर केले जाईल. प्रदर्शनातील चित्रे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन मानवाधिकार आयोग, भारत सरकारचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन महिला चित्रकार मनाली बोंडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

द फादर...लघु चित्रपटाला उत्तम प्रतिसाद

Mon Mar 11 , 2024
यवतमाळ :- समाजात वाढत चाललेली व्यासाणाधिनता, आणि त्या मागे वाढत असलेली गुन्हेगारी, या ज्वलंत विषयाला घेऊन यवतमाळ येथील तरुण निर्माता, लेखक, व डायरेक्टर, आकाश श्रीवास याने अत्यंत सुंदर चित्रपटाची निर्मिती केली असून 29 तारखेला हा लघुपट आकाश श्रीवास याने you tub चॅनल वर प्रदर्शित झाला. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ची ही संघर्ष कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल यात दुमत नाही. आकाश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com