संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- गांधी चौक येथे श्री हनुमान शिव पंचायत मंदिरात श्रावण सोमवार व अधिक मास निमित्य शिव पंचायत मंदिर कमेटीव्दारे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहाने थाटात संपन्न करण्यात आले.
श्रावण सोमवार आणि अधिक मास निमित्य श्री हनुमान शिव पंचायत मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम सोमवार (दि.२४) जुलै ला मंदिरात शिव पंचायत मंदिर कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव व सदस्य नंदलाल यादव यांचा परिवारा सह शिव पींड वर पाणी टाकुन दही, दुधाने, रुद्राभिषेक करुन विधिवत पूजा अर्चना करुन दोन दिवसीय कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली. मंगळवार (दि.२५) जुलै ला सकाळी महिलांनी मंदिरात विविधत पूजा अर्चना केली. त्यानंतर सरस्वती महिला मानस भजन मंडळ द्वारे सुंदरकांड आणि भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. शेवटी मंदिरात आरती व प्रसाद वितरण करुन दोन दिवसीय कार्यक्रमाची थाटात सांगता करण्यात आली. याप्रसंगी शिव पंचायत मंदिर कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव, सचिव लवजी तिवारी, पंडित जितेश , नंदलाल यादव, मालती वांढरे, रामशीला पराडकर, प्रेरणा उमाळे, अर्चना राठोड, ज्योती हिवरकर, सुशिला विश्वकर्मा, अर्चना मुदगल, चंदा बावनकर, किरण काळबांडे, शोभा गायकवाड, सरिता कश्यप, उज्वला लक्षणे, रागीणी, कमलादेवी यादव, विमलेस यादव , दुर्गा तिवारी सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.