मुंबईतील विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

  मुंबई : मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            वरळी-शिवडी जोडरस्तानरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्तापश्चिम द्रुतगती महामार्गअंधेरी-घाटकोपर लिंक रोडकलानगर जंक्शन आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले.

             बैठकीस आमदार सर्वश्री सदा सरवणकररवींद्र वायकरअजय चौधरीसुनील शिंदेस्थानिक नगरसेवक सचिन पडवळसमाधान सरवणकरश्रीमती श्रद्धा जाधवरोहिणी कांबळेएमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासमहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासुमहानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

            पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणालेवरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामामुळे बाधित रहिवाश्यांचे योग्य स्थलांतर करण्यात यावेपायाभूत आणि नागरी सोयी सुविधांना बाधा पोहोचल्यास त्या तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यातकाम सुरू होण्यास विलंब असेल त्याठिकाणी बॅरिकेट्स लावू नयेत. नरिमन पॉईंट-कफ परेड प्रस्तावित जोड रस्त्यामुळे बधवार पार्क कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या बोटींच्या वाहतुकीस बाधा येणार नाही यासाठी त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्याच्या सूचनाही श्री. ठाकरे यांनी केल्या.

            पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजनानागरी सोयीसुविधाजेथे शक्य आहे तेथे नागरी वने विकसित करणेअंधेरी-घाटकोपर लिंक रोड तसेच उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेत सुशोभीकरण आणि नागरी सुविधाकलानगर जंक्शन आणि स्थानिक रहिवासी संस्थांच्या परिसरात नागरी सुविधा तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक बेट तयार करून ते सुशोभित करणेजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावयाची सौंदर्यीकरणाची कामे आदींसंदर्भातही श्री.ठाकरे यांनी आढावा घेऊन योग्य नियोजनाबाबत निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डोंबिवलीतील 156 धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई  

Thu Feb 3 , 2022
 मुंबई : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली .             उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!