संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यातून 10 हजार च्या वर नागरिकांचा सहभाग असणार-माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर
कामठी ता प्र 11:- शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ,वाढत्या महागाईसाठी व पोकळ घोषणाबाजी करणाऱ्या सत्ताधारी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 16 एप्रिल ला नागपूर येथे वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या वज्रमुठ सभेसाठी कामठी तालुका स्तरावर नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी या वज्रमुठ सभेत कामठी तालुक्यातील प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून या सभेत 10 हजार च्या वर संख्येतील नागरिक सहभाग नोंदविणार असून वज्रमुठ सभा चांगलीच गाजनार आहे अशी माहिती माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आज 11 एप्रिल ला कामठी पंचायत सभागृहात आयोजित पत्रपारिषदेत दिली.
नागपूर येथे 16 एप्रिल ला महाविकास आघाडी च्या वतीने होणाऱ्या वज्रमुठ सभेच्या नियोजनासाठी कामठी पंचायत समिती सभागृहात आज 11 एप्रिल ला कामठी मौदा विधानसभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली व कांग्रेस चे नागपूर जिल्हा ग्रा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली .याप्रसंगी कामठी मौदा विधानसभा पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर ,जी प सदस्य दिनेश ढोले,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे ,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पत्रपरिषदेत माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले की, देशात महागाई गगनाला भिडली आहे, जीवणावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत ,गॅस सिलेंडर चे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.विजेचे दर वाढलेले आहेत,शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही,ओबीसी, एस सी,एन टी यांच्या आरक्षणावर गदा आणली जात आहे शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य बेरोजगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत.सर्वांना समान हक्क देणारे सरकार हवे आहे.या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 16 एप्रिल ला वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,कांग्रेस चे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी कांग्रेस चे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे नेते सभेला संबोधन करणार आहेत त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी सदर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.तसेच ओबीसी विषयी शासनाचे दुटप्पी धोरण आहे.घोषणाबाजी सरकार कोणत्याही समस्यांचे हल करीत नसून राज्याची सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टिकून आहे अशी प्रतिक्रिया माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत जी प सदस्य दिनेश ढोले, पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे ,येरखेडा ग्रा प चे सरपंच सारिताताई रंगारी,खैरी ग्रा प सरपंच योगिता धांडे ,किशोर धांडे,रत्नदीप रंगारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल इटकेलवार,कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव,आशिष मेश्राम,नरेंद्र शर्मा, आबीदभाई ताजी , यांच्यासह मोठ्या प्रमाणात कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.