काँग्रेसचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य ऐकून चीड येण्यापेक्षा मला त्यांची कीव करावीशी वाटते…. खरा इतिहास तोडून मोडून कसा जनतेसमोर मांडावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधान. अर्थात, विजय वडेट्टीवार यांच्या संस्कारांची परिभाषाच निराळी… अर्थार्जना करता मुलीला बार उघडून देणारे वडेट्टीवार काय संस्कार करणार ? आणि काय इतिहास जाणणार ?… आणि मग आपण तरी त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. पण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाला उत्तर देणे हे मला गरजेचे वाटते. नाहीतर हे महाशय अशीच विधाने करीत राहाणार आणि जनतेची दिशाभूल करत राहाणार.
सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा दिवस फाल्गुनातील अमावस्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आधीचा दिवस. वडेट्टीवार म्हणतात “छत्रपती संभाजी महाराजांचा खुन झाला आणि आम्ही गुढी बिडी उभारतो..” वडेट्टीवार हे स्वतः एक हिंदू असून देखील गुढी आणि बिडी असा उच्चार तरी कसे करू शकतात याचे आश्चर्य वाटते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हिंदू नववर्षाचे स्वागत करतो आणि त्यानिमित्ताने गुढ्या आणि पताका उभारतो… ही एक हिंदू अस्मिता आहे असे मला वाटते. पण जसे मी नेहमीच म्हणतो हिंदू हा दहशतवादी नसून हिंदुत्वाला गद्दारीचे गालबोट मात्र नेहमीच लागले आहे. वडेट्टीवारांनी एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा म्हणजे याचे उत्तर त्यांना नक्कीच मिळेल. आता राहिला प्रश्न गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तो १६८० साली. आणि खरे तर गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा ही महाभारतात देखील उल्लेखलेली आहे. हे वडेट्टीवारांना लक्षात आणून देणे हे माझे इति कर्तव्य. कारण ते माहिती असायला वाचन संस्कृती जपणारे व्यक्तिमत्व असावे लागते. विजय वडेट्टीवार संस्कृतीच विसरले आहेत तर वाचन संस्कृती त्यांना कुठून माहिती असणार.
महाभारत आदी पर्व अध्याय क्रमांक ६३ मध्ये नमूद केलेली कथा मी इथे आपणास सांगतोय.
उपरीचर राजा आणि इंद्राची ही गोष्ट. आपली आठवण राहावी या उद्देशाने सज्जनांचा प्रतिपाळ करणारी कळकाची एक काठी इंद्राने त्या उपरीचर राजाला बहाल केली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरीचर राजाने ती काठी जमिनीत रोवून ठेवली. तेव्हापासून थोर उपरीचर राजाने सुरू केलेल्या प्रघाताप्रमाणे त्यानंतर थोर थोर राजे आज देखील वर्षाच्या शेवटच्या दिवशी जमिनीत काठी रोवतात दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नवीन वर्ष प्रारंभ होते म्हणजेच वर्ष प्रतिपदेला त्या काठीवर शेल्यासारखे एखादे उंची वस्त्र बांधतात सुवासिक पुष्पांच्या माळांनी ती शृंगारतात आणि विधीपूर्वक ती खूप उंच उभारतात या काठीची म्हणजेच गुढीची पूजा म्हणजे ऊपरिचर वसु राजा वरील प्रीतीने स्वतः हंसरूप धारण केलेल्या भगवान इंद्राचीच पूजा होय.
हे केवळ वडेट्टीवारांच्या माहिती करता मी नमूद करतोय.
वडेट्टीवार,आपण असली प्रक्षोभक विधाने करून समाजमन स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे बंद करा. खरा इतिहास लोकांसमोर येऊ द्यायचा नाही ही काँग्रेस नीती आता जनतेच्या देखील लक्षात आली आहे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर आपण फक्त्त आणि फक्त्त राजकारणा करता कसे करतो हेच आजवर काँग्रेस पक्षाने दाखवले आहे आणि तेच तुम्ही देखील करता आहात…