लसीकरणामूळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली – राज्यमंत्री, डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर

-सतीश कुमार, गडचिरोली

गडचिरोली, दि.25 : कोविड संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढल्यामुळेच ओमायक्रॉन सारख्या नव्या विषाणूची तीव्रता कमी झाली असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य विभागाबरोबर झालेल्या बैठकीत व्यक्त केले. ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे आले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कोविड परिस्थिती व लसीकरणाबाबतची माहिती त्यांना दिली. लसीकरणात शहरी व ग्रामीण लसीकरणाची टक्केवारी पाहून त्यानूसार मोहिमा राबवाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी जिल्हयातील आरोग्य सुविधा व विविध साथरोगांबाबत राज्यमंत्री महोदयांना माहिती सादर केली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय जठार, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री यांचेसह अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

कोविड संसर्गासह राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य सुविधा, दवाखान्यांचे फायर ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीट बाबत माहिती घेतली. जिल्हयातील अहेरी येथील महिला रूग्णालयाच्या पुढिल निधीबाबत डॉ.रूडे यांनी राज्य स्तरावरून निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी येणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत सदर विषय घेणार असल्याचे सांगितले.

लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची 31 व्या क्रमांकावरून 16 क्रमांकावर झेप
राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गडचिरोली जिल्हयातील वाढत्या लसीकरणावर प्रशासनाचे अभिनंदन केले. गडचिरोली जिल्हा सुरूवातीला लसीकरणामध्ये राज्यस्तरावर मागे होता. यामध्ये मागील दोन महिन्यात चांगला वेग घेत 31 व्या क्रमांकावरून 16 क्रमांकावर झेप घेतली. याबाबत जिल्हयात राबविलेल्या उपक्रमांबाबतची माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी त्यांना दिली. घरोघरी लसीकरण मोहिम राबविल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे राज्यमंत्री यांनी नमूद करत सर्वांचे अभिनंदन यावेळी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

Tue Jan 25 , 2022
-सतीश कुमार, गडचिरोली गडचिरोली,(जिमाका) दि.25: साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत व दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक उत्सव, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!